YNWA

मी तरी..

तू असशील सुखात किंवा दुःखात,

मी तरीसुद्धा असेन तुझ्यासोबत..

तू असशील यशाची किंवा अपयशाची धनी,

मी तरीही नाही सोडणार तुझी साथ..

ynwa

तू कधी चुकशील आयुष्याच्या वाटेवर,

मी तरी असेन तुझा मार्गदर्शक..

तू कधी मुद्दामून करशील वावगं कृत्य,

मी तरी तुला ते करण्यापासून अडवीन..

तू स्तुत्य असशील तर प्रशंसाच होईल,

पण निंदाजनक कृत्य केलंस तर मी तरी तुझी चूक दर्शवीन..

तू असशील जरी शरीरानं दूर,

मी तरीही मनानं तुझ्याजवळ असेन..

तू जरी मला नाही मानलं मित्र,

मी तरीही आपली मैत्री जपेन..